शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनात कोटीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:49 IST

कोल्हापूर : शेतकºयांना शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देणारे माध्यम असलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनात रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. शेती औजारे, ट्रॅक्टर, पॉवरट्रिलर, चारचाकी वाहने, बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांसह ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुटीचा दिवस असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयांतून आबालवृद्ध मोठ्या संख्येने आले होते. आज, सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.येथील गांधी ...

कोल्हापूर : शेतकºयांना शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देणारे माध्यम असलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनात रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. शेती औजारे, ट्रॅक्टर, पॉवरट्रिलर, चारचाकी वाहने, बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांसह ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुटीचा दिवस असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयांतून आबालवृद्ध मोठ्या संख्येने आले होते. आज, सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.येथील गांधी मैदानावर शेतकरी सहकारी संघ व राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातर्फे संजीवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एक टन वजनाचा कसबे डिग्रजचा बैल... एक टनाची गाडी ओढणारा कºहाड येथील ब्लॅक बुल कुत्रा... शिंगणापूरचे पाच किलोचे कोंबडे... येलूरची लांब शिंगांची १४ लिटर दूध देणारी म्हैस... दीड फूट शिंगांचा बोकड... असे आकर्षण ठरलेले पशु-पक्षी पाहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. त्याचबरोबर प्रदर्शनातील खाद्यपदार्थ, कृषी साहित्य, आॅटोमोबाईल, शेती औजारे, विविध कीटक व तणनाशक व बचतगटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी व खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यामध्ये शेती औजारे, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, पॉवरट्रिलर, शेतीपंप, खते, बी-बियाणे यांची सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनात झाली. सकाळी दहापासून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमाभागातील शेतकरी व नागरिकांच्या गर्दीची रीघ रात्री दहापर्यंत कायम होती. गेल्या तीन दिवसांत अडीच लाखांहून अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली.

टॅग्स :agricultureशेती